स्मारकाचा वाद पेटला, विरोधकांनी सुचवला ‘मातोश्री’चा पर्याय

0
17
मुंबई,दि. १८– शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगला नाही तर साहेबांचे वास्तव्य राहिलेला मातोश्री बंगलाच योग्य असल्याचे मत मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षांनी मांडले आहे. बाळासाहेबांबद्दल आम्हालाही प्रचंड आदर आहे मात्र त्यांचे स्मारक महापौर बंगल्यात नव्हे तर भव्य जागेवर झाले पाहिजे असेही पालिका सभागृहात विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी निवेदन केले. महापौर बंगल्यातील स्मारकाला पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, सपा आदी विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी महापौर बंगल्यातील स्मारकाला विरोध केल्यानंतर आता मुंबई महापालिकेतही स्मारकावरून वाद पेटला आहे.शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची घोषणा झाल्यानंतर पालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता त्यांच्या सूरात सूर मनसे व सपाचा मिळाला आहे.