‘सकाळ‘चे बातमीदार महेंद्र महाजन यांना पोलिस उपायुक्त बारगळची मारहाण

0
16

नाशिक : मराठवाड्यासाठी सोडलेल्या पाण्याच्या प्रश्‍नासंदर्भात थेट पालकंत्र्यांना जाब विचारण्यासाठी सर्वपक्षीय नेते आणि शेतकऱ्यांनी आज (शनिवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. नियोजन भवनाबाहेरील संतप्त जमावाला शांत करण्यासाठी पालकमंत्र्यांनी ‘पाण्याची टंचाई भासणार नाही‘ असे आश्‍वासन दिले; मात्र त्यावर शेतकऱ्यांनी ‘पाणी का सोडले‘, ‘पालकमंत्री पाणी देणार कुठून‘ असे प्रश्‍न उपस्थित करून गोंधळ घातला. दरम्यान संतप्त शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमारही केला. पत्रकारांनाही पोलिसांनी मारहाण केली. त्यात ‘सकाळ‘चे बातमीदार महेंद्र महाजन यांनाही मारहाण झाली आहे. उपायुक्त बारगळ यांनी ‘सकाळ‘चे मुख्य बातमीदार महेंद्र महाजन यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मारहाण केली. यावेळी उपस्थित पत्रकारांनी धाव घेत त्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला असता बारगळ यांनी त्यांनाही जुमानले नाही.