संत्राला भरपाई देण्याच्या मागणीसाठी रायुकाचे काटोलमध्ये आंदोलन

0
14

शेतकऱ्यांना मदत मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही – सलील देशमुख

काटोल, दि. २१ – राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नागपूर जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकयाना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तसेच संत्र्याला भाव मिळावा या मागणीला घेून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व विदर्भ प्रमुख सलील देशमुख यांच्या नेतृत्वात काटोल येथे आंदोलन करण्यात आले.यावेळी काही संत्रा उत्पादकांनी मुंडन करुन काढली शासनाची प्रतीकात्म प्रेत यात्रा काढली.सोयाबीनचे नुकसान झाले, कपाशीला भाव नाही आणि संत्रा आता मातीमोल भाव मिळत नाही. उत्पादन खर्च तर सोडा साधा तोडणीचा खर्च निघणे कठीण असतांना शासन मात्र मुक गिळुन बसले आहे. यालट राज्यात जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस व कॉेग्रेसचे सरकार होते. त्यावेळी वेळीवेळी राज्य शासनाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना भरघोस मदत देण्यात आली होती. किमात तशी तरी मदत या सरकारने करावी. जो पर्यत शेतकऱ्यांना सरकार मदत करीत नाही तो पर्यत आपण स्वस्त बसणार नाही असे जाहीर आवाहन करीत राज्य सरकारला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व विदर्भ प्रमुख सलील देशमुख असे म्हणाले.

 देशमुख म्हणाले, गेल्या काही दिवसापासुन शेतकऱ्यांची परिस्थीत आज हालाखीची आहे. अंबीया बाहार चांगला आल्याने यातुन काही मदत होईल अशी अाशा असतांना बाजारात चांगला भाव मिळत नाही. बाजारात आज संत्राला २००० हजार रुपयापासुन तर ५००० हजार रुपये पर्यत भाव मिळत आहे. यातुन साधा तोडणीचा खर्च सूध्दा निघत नाही. बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतक-यांचा शेकडो टन संत्रा काटोल व नरखेडच्या बाजार समितीच्या आवारात पडला आहे. तोडणे सुध्दा परवडत नसल्याने संत्रा झाडालाच आहे. तो आता गळुन पडत आहे. या शेतकऱ्यास शासनाने मदत करावी अशी मागणी यावेळी सलील देशमुख यांनी केली. शासनाच्या विरोधात यावेळी संजय कामडी, अरुण उमाठे, रवि कामडी, अरुण सुरकार, बालाजी कावडकर, लिलाधर कोल्हे, शामराव चनकापूरे, लक्ष्मणराव उरकुडे सलीम माखानी, भुषण कोल्हे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी मुंडन करुन शासनाचा निषेध केला. शिवाय तहीसील कार्यालयावर मोर्चा नेवून शासनाची प्रतीकात्मक प्रेत यात्रा काढली. यावेळी सलील देशमुख यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार रमेश कोडपे यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनास शेकापचे नगराध्यक्ष राहुल देशमुख, नगरसेवक राजु डेहनकर यांनी आंदोलन स्थळी भेट देवून आपले समर्थ दिले.
या आंदोलनात निळकंठराव ढोरे,बापूराव सातपूूते, भाई मधूकरराव मानकर, अनुप खराडे, नरेश अरसडे, बाबा शेळके, गणेश चन्ने, सतिश पुंजे, अमीत काकडे आदींनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. या आंदोलनात रवी वैदय,गणेशसिंग बावरी, गणेश सावरकर, अजय लडसे , मयुर उमरकर, सचिन चरडे, उदयन बन्सोड, काका खत्री, किशोर मुंदाफळे, उमेश बंदे,उदय ठाकरे, कुरवास कुकडे, कमलेश गुप्ता, संजय राउत,बाबा फिस्के, रूद्रांगण चव्हाण, ब्रम्हानंद असरडे यांच्यासह मोठया प्रमाणात संत्रा उत्पादक या आंदोलनात सहभागी झाले होते.