सारस महोत्सवाला सीएमच्या माध्यम सल्लागारासह मुबंईतील पत्रकारांची हजेरी

0
17

गोंदिया,दि.२०- गोंदिया जिल्हा पर्यटन समितीच्या वतीने हॉटेल गेटवे येथे आयोजित सारस महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रविकिरण देशमुख यांची विशेष उपस्थिती होती.विशेष म्हणजे यावेळी राजधानीतील विविध वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधीनीही उपस्थिती लावली होती.यामध्ये झी २४ तासचे मुंबई येथील विशेष प्रतिनिधी दिपक भातुसे, महाराष्ट्र वन वृत्तवाहिनीचे विशेष प्रतिनिधी आशिष जाधव, लोकसत्ता मुंबईचे विशेष प्रतिनिधी उमाकांत देशपांडे, दैनिक सकाळ मुंबईचे विशेष प्रतिनिधी संजय मिस्कीन, मुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव राजेश नार्वेकर, कैलाश शिंदे व श्री. बिलोलीकर यांचा समावेश होता.