‘समृद्ध जीवन’ची सर्व खाती सील करण्याचे आदेश

0
10

मुंबई : सहकार मंत्रालयाने ‘समृद्ध जीवन’च्या महेश मोतेवारांना दणका दिला असून महेश मोतेवार यांच्या समृद्ध ग्रुप कंपनीचे सर्व खाती तातडीने सील करण्याचे आदेश दिले गेले आहेत. याबाबत सहकार मंत्रालयाकडून विशेष तपास सुरु होता. तो पूर्ण झाल्यानंतर हे आदेश देण्यात आले आहेत.

सेबीने बंदी आणूनही ५२५ कोटींचा महसूल टीव्ही चॅनल्स आणि संलग्न व्यवसायामध्ये गुंतवल्यामुळे मोतेवारांवर याआधीच एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती किरीट सोमय्यांनी दिली. दरम्यान, समृद्ध जीवन गृपने विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचीही आरोप आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग याबाबत विशेष तपास करत असल्याचेही किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.