अकोल्यात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन!

0
13

अकोला दि. २६ –: डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११७ व्या जयंतीनिमित्त २७ ते २९ डिसेंबरपर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन अँग्रोटेक-२0१५ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २७ डिसेंबर रोजी सकाळी १0 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, कृषिमंत्री एकनाथ खडसे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील.

उद्घाटन कार्यक्रमाला अकोल्याचे खासदार संजय धोत्रे, महाराष्ट्र कृषी व शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे, डॉ.पंदेकृविचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्यासह आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, बळीराम सिरस्कार, प्रकाश भारसाकळे, हरीश पिंपळे, आमदार तथा कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य गोपीकिशन बाजोरिया, अमरीश पटेल, संजय रायमुलकर, अमित झनक, शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, महापौर उज्ज्वला देशमुख, कार्यकारी परिषदेचे सदस्य जैनुद्दीन जव्हेरी, नितीन हिवसे, डॉ. जयंत देसाई, गोपी ठाकरे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रामदास मालवे, तसेच जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.