बॉण्डमध्ये वाढ करण्यास निवासी डॉक्‍टरांचा विरोध

0
6

मुंबई – सरकारी रुग्णालयांत शिक्षण घेणाऱ्या डॉक्‍टरांना ग्रामीण भागात ठरावीक काळ प्रॅक्‍टिस करावी लागते. हा काळ वाढवण्याचा सरकार विचार करत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्याला मार्ड (महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंटस्‌ डॉक्‍टर) या डॉक्‍टरांच्या संघटनेने विरोध केला आहे. 

बॉण्डमध्ये वाढ करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानाचा त्यांनी निषेध केला आहे. राज्यभरातील निवासी डॉक्‍टर शनिवारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. एमबीबीएस, पोस्ट ग्रॅज्युएशन व सुपर स्पेशालिटी या पदव्या मिळाल्यानंतर डॉक्‍टरांना ग्रामीण भागात एकेक वर्ष काम करणे बंधनकारक आहे. यात वाढ करण्यास “मार्ड‘चा विरोध आहे.