चंद्रपुरातील महाविद्युत औष्णिक विद्युत केंद्राची खराब हवा

0
30

…पहा काय होतात परिणाम
चंद्रपूरातील अंदाजे १३००० हेक्टरवर उभारलेल्या महाविद्युत औष्णिक विद्युत केंद्रात कोळशावर आधारित विद्युत प्रकल्पामुळे होणा-या हवेच्या खराब दर्जाचे लोण मुंबई ते पुण्यापर्यंत पसरत असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आले आहे. चंद्रपूरातील महाविद्युत औष्णिक केंद्रामुळे आरोग्यावर होणा-या दुष्परिणामांचा अहवाल नुकताच ‘सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी एण्ड क्लिन एअर’ (सीआरईए) या पर्यावरणप्रेमी संस्थेकडून प्रकाशित करण्यात आला. या प्रकल्पामुळे २०२० साली चंद्रपूरात ८५ प्रसूतीकाळापूर्वी जन्मलेल्या बाळांचा मृत्यू झाला आहे. नागपूरात ६२, यवतमाळमध्ये ४५, मुंबईत ३०, २९ पुण्यात आणि नांदेडमध्ये प्रसूतीकाळापूर्वी जन्मलेल्या बालकांचा मृत्यू झाला आहे.

चंद्रपूर महाविद्युत औष्णिक केंद्रातील जुने युनिट ३ आणि ४ आता बंद करायला हवे. उर्वरित युनिट्समध्ये सल्फर डायऑक्साइडच्या मोठ्या प्रमाणात होणा-या उत्सर्जनावर प्रतिबंधात्मक उपाय योजायला हवे.
– सुनिल दाहिया, अभ्यासक, सीआरईए

याआधीही ढासळत्या हवेच्या पातळीमुळे नवजात बालकांना श्वसनाच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा राष्ट्रीय पातळीवरील विविध शहरांमधील अभ्यासांतून समोर आले आहे. चंद्रपूरातील महाविद्युत औष्णिक केंद्रामुळे ढासळणा-या हवेच्या दर्जाबाबर नुकतेच राष्ट्रीय हरित लवादानेही कडाडून टीका केली होती. त्यात सीआरईने २०२० साली हवेच्या खराब दर्जामुळे चंद्रपूरातील कर्मचारी तसेच स्थानिकांकडून आजारपणामुळे तब्बल ३४ हजार सुट्ट्या वर्षभरात घेतल्या गेल्या. तर ३० हजार सुट्ट्यांचा रॅकोर्ड नागपूरात झाला. या हवेच्या ढासळत्या दर्जाने नजीकच्या भागांतील लहान मुले, वृद्ध तसेच गर्भवती महिलांनाही त्रास उद्भवण्याची भीती संस्थेने व्यक्त केली.

काय झाला परिणाम?
चंद्रूपूरातील महाविद्युत औष्णिक केंद्रातील कोळशाच्या वापराने या केंद्रातून अमर्यादित प्रमाणा सूक्ष्म धूलिकणाचे उत्सर्जन होते. सूक्ष्म धूलिकण हे मानवी आरोग्यासाठी जीवघेणे ठरतात. २०२० साली केंद्रातून सूक्ष्म धूलिकणांचे ४ हजार ७२४ टन उत्सर्जन झाले. सल्फर डायऑक्साईडचे १ लाख ३ हजार १० टन उत्सर्जन झाले. नायट्रोजन डायऑक्साईडचे २८ हजार ४१७ टन उत्सर्जन झाले. हे तिन्ही धूलिकण मानवी आरोग्यावर गंभीर स्वरुपाचे दूरगामी परिणाम करतात. २०२० साली या केंद्रामुळे मध्य भारतातील माणसांच्या आरोग्याचा अहवाल सीआरईने प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, आठ लाख आजारपणांच्या सुट्ट्यांचा मध्य भारतात रॅकोर्ड झाला. १ हजार ९०० माणसांना दम्याचा विकार जडला. यात ८०० मुलांचाही समावेश आहे. १ हजार ३०० जणांनी जीव गमावला तर १ हजार ८०० मुले प्रसूतीकाळपूर्वच जन्मली.