शिक्षकेतर कर्मचार्याने मुख्यमंत्र्यांना लिहले रक्ताने पत्र 

0
7


आमगाव:दि. ९-एकीकडे राज्य सरकार विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून कुशल शिक्षण द्यावं यासाठी पुढाकार घेत आहे तर दुसरीकडे राज्यातील खाजगी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने अनेकदा आंदोलन करण्यात आली. मात्र कुठलाही तोडगा न निघाल्याने गोंदियातील एका शिक्षक्केतर कर्मचार्याने मुख्य मंत्र्यांना चक्क आपल्या रक्ताने पत्र लिहून आंदोलनाला एक नवे वळण दिले आहे. यशवंत मानकर असे या आंदोलंन कर्त्याचे नाव आहे. मानकर यांनी मुख्य मंत्र्यांना भेटून हे निवेदन सादर केले आहे.त्यावेळी सोबत देवरी आमगावचे आमदार संजय पुराम आणि अॅड.येशुलाल उपराडे,राकेश शेंडे,दिनेश वंजारी ,अजय पाठक हे सुध्दा उपस्थित होते. मुख्यमंत्र्यानीही या पत्रानंतर विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे मानकर यांनी म्हटले आहे.
राज्यात भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नियंत्रणात कुशल मनुष्यमाण करण्याचे ध्येय तंत्रशिक्षणातून पूर्ण करण्यात येत असून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षणातून पदविका ,पदवी व पद्वियुतर अभ्यास क्रमाची सुरवात करण्यात आली. मात्र राज्यातील खाजगी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकोतर कर्मचार्यांची संचालकांची पीडवणूक होत असल्याचा आरोप कर्मचारी करीत आहे सरकार बदलले धोरण बदलेल या आशेवर हे कर्मचारी मागील २८ वर्षापासून लढा देत आहेत. मात्र आता तरी या शिक्षक शिक्षकोतर कर्मचार्यान कडे मुख्य मंत्री किवा शिक्षण मंत्री लक्ष देतील काय या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
शिक्षक शिक्षकोतर कर्मचारी खाजगी तंत्र निकेतन महाविद्यालय आमगाव गोंदिया 
राज्यात भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नियंत्रणात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचे ध्येय तंत्रशिक्षणातून पूर्ण करण्यात येत असून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षणातून पदविका ,पदवी व पद्वियुतर अभ्यास क्रमाची सुरवात करण्यात आली मात्र राज्यातील खाजगी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकोतर कर्मचार्यांची संचालकांची पीडवणूक होत असल्याचा आरोप कर्मचारी करीत आहे सरकार बदलले धोरण बदलेल या आशेवर हे कर्मचारी मागील २८ वर्षापासून लढा देत आहे मात्र आता तरी या शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्याकडे मुख्यमंत्री किवा शिक्षण मंत्री लक्ष देतील काय या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे 
विशेष म्हणजे या आंदोलना साठी शिक्षकोतर कर्मचारी यशवंत मानकर यांनी आमगावयेथील ग्रामीण रुग्णालयात रीतसर अर्ज करुन आपल्या शारीरातील ५ एम एल रक्त काढून ते पत्र वैद्यकीय अधिकारी सचिन पाटील यांच्या उपस्थितीतच लिहिले.मानकर हे भाजपचे माजी आमदार केशवराव मानकर यांच्या संस्थेत नोकरीला आहेत.