ज्येष्ठ पत्रकार अरूण टिकेकर यांचे निधन

0
9
मुंबई, दि. १९ – ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत अरूण टिकेकर यांचे मंगळवारी सकाळी मुंबईत निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने मंगळवारी त्यांची प्रकृती बिघडली आणि सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत लोकसत्ता या दैनिकाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे कल्पक संपादक म्हणून सर्वसामान्य वाचकांना अरुण टिकेकर हे नाव माहित आहे पण याव्यतिरिक्त इंग्रजीसाहित्याचे अभ्यासक आणि अध्यापक, तसेच एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक म्हणूनही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. मुंबई विद्यापीठाच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले  अरुण टिकेकर यांनी या ग्रंथाचे लेखन केले आहे.