पापा कहते है फेम संगीतकार मिलिंद ‘सारस’ दर्शनाला गोंदियात

0
6

 

खेमेंद्र कटरे
गोंदिया ,दि.१९- गोंदिया जिल्ह्यात गेल्या महिन्या भरापासून सुरू असलेल्या ‘सारस महोत्सवानेङ्क जनसामान्यानंच नव्हे तर सेलिब्रेंटींनाही भुरळ पाडली आहे. कधी चर्चेत नसलेल्या सारस मुळे गोंदियाचेही नाव आता जागतिक पातळीवर पोहचू लागले आहे. याची प्रचिती प्रसिद्ध सिनेसंगीतकार आनंद-मिलिंद जोडीचे मिलिंद श्रीवास्तव यांनी आज(दि.१९)सकाळच्या सुमारास सारस जोडप्यांचे दर्शन घेऊन दिले आहे.नागपूरच्या पलिकळे असलेल्या गोंदियात येण्याची आपली पहिलीच वेळ,त्यातही आमचे मित्र जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी आणि कस्टम आयुक्त राहिलेले युवा व्यवसायी हेमंत कोठीकरांच्या आग्रहास्तव देशात कुठेच न आढळणारा सारस बघायला आलो.गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यात आहे.सोमवारला कान्हाची सफारी करूनही आलो,परंतु मला गोंदियातील ज्या काही मोजक्या स्थळांना भेट अल्पावधीत सारस पक्ष्याच्या निमित्ताने देता आली.ती निसर्गरम्य स्थळे बघून आपली चित्रपटसृष्टी आपल्याच राज्यातील निसर्गरम्य स्थळे सोडून विदेशात कशाला जातात अशा प्रश्न बिबंवून गेल्याची बोलकी प्रतिक्रिया संगीतकारमिलिंद  बोलून गेले.
जिल्ह्यातील काही पर्यटन स्थळाला दिली भेट मनाला भोवून गेलेली आहे. कधी नव्हे असे निसर्गरम्य पर्यटन स्थळे त्यातच आपल्या श्वासाच्या अखेरपर्यंत प्रेमाचा संदेश देत जोडप्याने राहणारे सारस पक्ष्यांचे दर्शन खरोखरच मनुष्यातील जीवनालाही नवा संदेश देणारा असल्यानेच सारस खरा ‘सारस’  असे मिलिंदम्हणाले.
संगीतकार मिqलद हे आपले मित्र हेमंत कोठीकर यांच्यासह आज मंगळवारी गोंदिया तालुक्यातील परसवाडा आणि झिलमिली या सारस स्थळाला भेट दिली.पावसामुळे जवळून बघता न आले तरी बायनाकुलरच्या माध्यमातून झालेले सारस दर्शन आणि तेथील नागरिकांमधील सारस सवंर्धनप्रती असलेले आकर्षण बघून आपल्याही मनात सारस पक्ष्यांप्रति जिव्हाळा निर्माण झाला. परंतु जवळून पाहण्याची हौस मात्र पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे जवळून पाहण्याकरिता आज नव्हे तर पुन्हा कधी तरी परत येण्याची खूणगाठ मनात निर्माण झालेली आहे.
सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी सोबतच गोंदिया जिल्ह्याची ओळख ‘सारस जिल्हाङ्क म्हणून व्हावी यासाठी आपण एक चांगले संगीतबद्ध गीत तयार करणार तसेच गोंदिया येथील एका कार्यक्रमात फेब्रुवारी महिन्यात येणा-या चित्रपट अभिनेते सलमान खान ला या ठिकाणी भेट देण्याची तसेच या सारस महोत्सवाचे ब्रॅड अम्बेसेडर होण्याबाबत ही आपण नक्कीच त्यांना बोलणार अशी ग्वाही ही त्यांनी दिली. सोबत गोंदिया जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि चित्रपट सुष्टीला शुटींग करिता हवे असलेले चुलबंद, मांडोदेवी, बोदलकसा,नागझिरा ,इटियाडोह सारखे स्थळ या ठिकाणी असल्याने भविष्यात या बाबतची माहिती मुंबईतील चित्रपट निर्मात्यांना देऊन त्यांना ही याकडे आकर्षित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आपण सहकार्य करणार आणि भविष्यात परत एकदा सारस बघण्यासाठी आपल्या सहका-यांसोबत गोंदियाला येणार असे ही त्यांनी सांगितले. तसेही गोंदिया चे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी आपले जुने मित्र आणि जुनी ओळख कायम ठेवत त्यांनी आम्हाला दिलेले निमंत्रण आम्ही प्रेमाने स्वीकारले परंतु मुंबई,पुण्यात गोंदियाच्या ‘सारसङ्क ला जे स्थान प्रसिद्धी माध्यमांनी दिले.ते तिथंपर्यंत पोहचविण्याचे आणि गोंदियाला गोंदियाचे सारस ही ओळख पटवून देण्यात गोंदिया जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांचा मोलाचा वाटा असल्याचेही मिलिंद म्हणाले.

‘लिटील गांधीङ्क व ‘टाय द नॉटङ्क लवकरच येणार
येत्या एक दोन महिन्यात आपला लिटील गांधी हा चित्रपट प्रदर्शित होत असून धूम्रपान नको या संदेशावर आधारित गाणी ही या चित्रपटात गायीली आहे. हे चित्रपट समाजाला व्यसनमुक्तीचा संदेश देणारे असल्याने माननीय पंतप्रधान मोदी यांना टॅक्स फ्री चित्रपट करण्यासंदर्भात निर्माते विनंती ही करणार आहेत. तर दुसरीकडे हॉलीवुड मधील ‘टाय द नॉटङ्क हे चित्रपटही येत्या दोन महिन्यात प्रदर्शित होणार असून त्यातही आपण संगीत दिलेले आहे. सोबत गेल्या काही वर्षापासून बंद असलेले स्टेज शो पुन्हा सुरू करणार असल्याचेही ते म्हणाले.