खुल्या प्रवेशिका आमqत्रत न करताच व्यसनमुक्ती समेलनात पत्रकारांना मिळणार पुरस्कार?

0
14

सामाजिक न्याय व विशेष विभागाची संशयास्पद भूमिका,मुख्यमंत्री लक्ष घालणार काय
सामाजिक न्याय मंत्र्याच्या कार्यक्रमाला या प्रकारामुळे लागणार गालबोट
पत्रकार पुरस्कारासंदर्भात माहिती संचालनालय अनभिज्ञ

गोंदिया,दि.१९- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि नशाबंदी मंडळ यांच्या संयुक्त वतीने २२ आणि २३ जानेवारी रोजी गोंदिया येथील स्वागत लॉन येथे देशातील चौथे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या समेलनानिमित्त राज्यातील काही पत्रकारांना व्यसनमुक्तीच्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.परंतु रविवार १७ जानेवारीला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या पत्रकार परिषद घेईपर्यंत राज्यातील कुठल्याच जिल्हा माहिती कार्यालयामार्फत पत्रकारांना प्रवेशिका मागविण्यात आल्या नाहीत.विशेष म्हणजे माहिती संचालन कार्यालयच यासंदर्भात अनभिज्ञ असल्याचे तपासणी केल्यानंतर समोर आले.जर माहिती कार्यालयामार्फेत प्रवेशिका मागविल्या गेल्या नाही तर सामाजिक न्याय विभागाने आपल्या स्तरावर कुठल्या वृत्तपत्रात यासंदर्भात बातमी देऊन प्रवेशिक मागविल्या याचाही तपास केल्यानंतर कुठेच उल्लेख दिसून येत नसल्याने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्र्यांना आपल्या जवळच्याच पत्रकारांना हा पुरस्कार देऊन केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरविण्याचा प्रयत्न तर नसावा अशा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
वास्तविक व्यसनमुक्त क्षेत्रात काम करणारा त्यासदंर्भातील लेखन सतत करणारा आणि व्यसनमुक्तीच्या गावखेड्यातील कार्यक्रमांना प्रत्यक्ष हजर राहून त्यासंदर्भात जनजागृती करणाèया पत्रकाराला हा व्यसनमुक्तीचा पुरस्कार देण्यात यावा असा उद्देश असला पाहिजे.परंतु ज्या पद्धतीने अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या या कार्यक्रमाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी कुणाची नाव निश्चित झाली याची विचारणा सामाजिक न्यायमंत्र्यांना पत्रपरिषदेत करण्यात आली होती,तेव्हाच त्यांनी अद्याप नावे निश्चित झाली नाही आणि प्रवेशिका मागविण्यात सुध्दा आल्या नाही असे उत्तर दिले,तेव्हाच कुठे तरी या पुरस्काराच्या निवडीत माशी qशकत असल्याचे स्पष्ट झाले होते.
पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्याच मतदारसंघात या पुरस्काराबद्दल पत्रकारांत चांगलाच रोष दिसून येत आहे.ग्रामीण भागातील पत्रकारांना या पुरस्काराची माहितीच नसल्याचे समोर आले आहे.विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात असे काही पत्रकार आहेत जे र्निव्यसनी असून आपल्या गाव परिसरात नेहमीच दारूबंदीसह व्यसनमुक्ती करिता सतत कार्यक्रम घेऊन जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अशा पत्रकारामध्ये गोंदिया जिल्ह्यात प्रामुख्याने चंद्रकुमार बहेकार हे सालेकसा सारख्या आदिवासी दुर्गम भागातील असून ते दरवर्षी आपल्या गावात तुकडोजी महाराज जयंतीच्या निमित्ताने आठवड्याभर व्यसनमुक्तीसह इतर कार्यक्रम सतत गेल्या अनेक वर्षापासून राबवीत आहेत.त्याचप्रमाणे अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ हा सामाजिक न्यायमंत्र्याचा या मतदारसंघात नवेगावबांध येथील दारूबंदी व्हावी याकरिता सातत्याने प्रयत्न करणारा युवा पत्रकार म्हणून सतीश कोसरकर यांचा उल्लेख करता येईल.कुठलेही व्यसन न बाळगता पत्रकारितेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपर्यंत पोचलेले बोंडगावदेवी येथील चंद्रशेखर ठवरे हे आजही पत्रकारितेशी संबध ठेवून आहेत.देवरीसारख्या आदिवासी नक्षलभागातील चिचगड येथे राहून समाजात जनजागृतीच्या कार्यात नेहमी पुढे राहिलेले सुरेश गिèहेपुंजे यांच्यासारख्या अनेक पत्रकारांनी व्यसनमुक्तीसह समाजजागृतीच्या कार्यात हिरहिरीने सहभाग नोंदविला आहे.परंतु दुःखाची गोष्ट की सामाजिक न्याय मंत्र्याच्या जिल्ह्यात होणाèया ४ थ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्त साहित्य समेंलनातील पत्रकार पुरस्कारांच्या यादीत यापैकी कुणाचेही नाव आहे की नाही हे तर २३ जानेवारीलाच कळणार असले तरी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून ज्या काही एका पत्रकाराची निवड करावयाची असेल तेव्हा गोंदिया जिल्ह्यात या पत्रकारांच्या नावाचा पुरस्कारासाठी उल्लेख न झाल्यास त्यापेक्षा दुसरे दुर्देव या साहित्य समेंलनाचे राहणार नाही अशी भावना ग्रामीण भागातील पत्रकारामध्ये निर्माण होऊ शकते.