व्यसनमुक्त समेलनात १० ठराव पारीत

0
37

गोंदिया,दि.२३-येथे आयोजित ४ थ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य समेलनांच्या समारोप सत्रामध्ये समेलनाध्यक्ष मुक्ता पुणतांबेकर यांच्या उपस्थितीत १० ठराव समंत करण्यात आले.त्यामध्ये शालेय कर्मचाèयांनी वेसन करून नये या शासन निर्णयाचा व्यसनमुक्ती साहित्य समेलन अभिनंदन करते.दारूच्या परवान्यावर आधी २ बाटल्या दारू मिळत असे,आता मोठ्या आकाराच्या १२ बाटल्या देण्याची परवानगी देण्यात आली आहे,या निर्णयाचा या समेंलनात निषेध नोंदविण्यात आला.२०१२ च्या व्यसनमुक्ती धोरणाची प्रभावी अमंलबजावणी व्हावी.व्यसनमुक्तीच्या धोरणांची प्रभावी अमलबजावणी व्हावी,यासाठी राज्यस्तरीय समितीची निवड करावी.ही समिती सामाजिक न्याय मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली व्हावी.महाराष्ट्र केंद्र शासन अनुदानित जी व्यसनमुक्ती उपचार व पुनवर्सन केंद्र आहेत.त्यांच्या अनुदानाची प्रकिया सुलभ व्हावी.बीएड,डीएड च्या अभ्यासक्रमात व्यसन मुक्ती संदर्भातील अभ्यासक्रम समावेश करून त्यांना प्रशिक्षित करण्यात यावे.समाजकल्याण विभागातंर्गत कार्यरत असलेल्या समाजकार्य महाविद्यालयातील विद्याथ्र्यांची निवड करून त्यांना व्यसनमुक्तीचे दूत म्हणून कार्य करण्याचे प्रशिक्षण देण्यात यावे.व्यसनमुक्ती मॅराथानचे आयोन दरवर्षी एका जिल्हयात व्हावे.चित्रपट आणि नाट्यगृहात प्रयोग सुरू होण्यापूर्वी व्यसनमुक्तीचा संदेश देणारी चित्रफीत आणि ध्वनिफीत निव्र्यसनी सेलीब्रेटी कडून प्रसारित करण्यात यावी.सामाजिक न्याय विभागाने जिल्हाधिकारी मार्फत याची अमंलबजावणी करावी.आणि दहावा ठराव दारू/तंबाखूजन्य पदार्थांच्या वेष्टनावर संत,महात्मे,सुधारक,देव-देवतांच्या नावाचा उपयोग करता कामा नये हा घेण्यात आला.