४२ व्यक्ती, १० संस्थांना व्यसनमुक्ती पुरस्कार

0
25

गोंदिया, दि.२३ : चौथ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात व्यसनमुक्ती सेवेसाठी ४२ व्यक्ती व १० संस्थांना पुरस्कार केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देण्यात आले. पुरस्कार देण्यात आलेल्यांमध्ये मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे, सुरेश हेडंबा, पुणे येथील दत्ता श्रीखंडे, डॉ. श्री. दत्ता , संङ्कतीराव हंबीर, पोलीस अधिकारी सुरेश मेकला, कोल्हापूर येथील ज्ञानदेव पाटील, नाशिकचे चंद्रशेखर नामपुरकर, धुळेचे सुभाष कुलकर्णी, अहमदनगरचे हमीद सय्यद, गौरव बिडवे, धीरज शर्मा, जळगावचे मुकुंद गोसावी, अमरावतीचे विद्यासागर धर्माधिकारी, महादेवराव बडनेरकर, बुलडाण्याचे वासुदेव देशपांडे, शुभानराव देशमुख, ईश्वर मगर, वाशिमचे खंडेराव मुंढे, यवतमाळचे चंद्रबोधी धायवटे, अकोलाचे अशोक रामटेके, नागपूरचे रवींद्र भुसारी, ज्येष्ठ पत्रकार भुपेंद्र गणवीर, विनोद गजघाटे, गोंदियाचे हिदायत शेख, बोधानंद रोडगे, बळीराम वाघाये, गडचिरोलीचे दत्तात्रय कुंभरे, पोलीस अधिकारी संदीप पाटील, भंडाराचे ब्रम्हदास हुमणे, चंद्रपूरचे अनिरुद्ध बनकर, केशवराव शेंडे, लक्ष्मीकांत धानोरकर, औरंगाबादच्या मंदाकिनी चौकडे, सुचिता देशपांडे, परभणीचे ज्ञानोबा मुंढे, बीडच्या राहीबाई धुमाड, जालनाचे बंडू जाधव, qहगोलीचे दत्तात्रेय दंडे, जगण जाधव, कैलास कणसे तर, संस्थांमध्ये पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय डॉ. डी. एन. रोड फोर्ट मुंबई, सलाम मुंबई फाउंडेशन मुंबई, दी. आरचिड स्कूल बानेर पुणे, बजाज इलेक्ट्रीकल्स लिमिटेड शिरूर पुणे, नवजीवन विद्या विकास मंडळ नगाव धुळे, विश्वरचना ग्रामीण विकास संस्था केकाटपूर अमरावती, संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था पारस अकोला, वल्र्ड ल्यिूअल स्पीरिक्चुअल ट्रस्ट उमरेड नागपूर, अंबुजा सिमेंट फाउंडेशन चंद्रपूर, डोंगर तुकाई ग्रामविकास प्रतिष्ठान नाथनगर परभणी यांचा समावेश आहे.