राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर

0
11

मुंबई, दि. १० –राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बुधवारी विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली. विजया रहाटकर या सध्या भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी औरंगाबादचे महापौरपदही भुषविले आहे. रहाटकर यांच्याशिवाय आणखी सहा सदस्यांचीही महिला आयोगावर नेमणूक करण्यात आली.