भाजप नगरसेविका भावनाताईने वाणात दिले ‘डस्टबीन’…!

0
12

गोंदिया,दि.10-समाजाच्या कुठल्याही क्षेत्रातील कार्य असो ते नेहमीच हिरहिरीने करण्यासाठी सदैव तत्पर असणार्या आणि सामाजिक सलोख्यासोबतच परिसरातील आरोग्याला महत्व देणार्या गोंदिया नगरपालिकेच्या भाजपच्या नगरसेविका भावनाताई कदम यांनी यावेळी मात्र हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलामध्येच नव्हे तर जनतेतही एक नवा संदेश देण्याचा आगळावेगळा प्रयत्न केला.त्या प्रयत्नांची सर्वच स्तरातून प्रशंसा केली जाऊ लागली आहे.कारण काय तर आपल्या प्रभागातील महिलांसाठीच नव्हे तर शहरातील महिलासांठी खुलेहळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करुन त्या कार्यक्रमात महिलांना स्वच्छ घर स्वच्छ शहर हा संदेश देण्याच्या हेतून वाण स्वरुपात ‘डस्टबीन’ दिले. भावनाताईने महिलांना वाणातून ११०० घरघुती कचरा पेटीचे वाटप केले. वाणाच्या कार्यक्रमात आलेल्या महिलांनी कदम यांनी सुरु केलेल्या उपक्रमाची प्रशंसा केली,आणि आपणही स्वच्छ प्रभाग स्वच्छ शहर मोहिमेत सहभागी असल्याचा निर्धार व्यक्त केला.

dustbin vatap

 नगर सेविका  कदम यांनी आधी आपल्या घरातूनच स्वच्छतेची सुरवात व्हावी यासाठी हा उपक्रम हाती घेतला, घरात साचलेला कचरा मागच्या नालीत न फेकता घरात असलेल्या कचरा पेटीमध्ये जमा करून घंटा गाडी आल्यावर हा कचरा त्यात टाकून शहर स्वच्छ ठेवण्यात मदत होईल असे सांगितले.