कला राजाश्रित नव्हे राज्य पुरस्कृत असावी- पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
6

मुंबई : कला ही राजाश्रित असते असे म्हटले जाते. पण माझ्या मते कला राजाश्रित नव्हे तर राज्य पुरस्कृत असावी. कलेत एक शक्ती असून सामाजिक बदल घडवण्याची ताकद असते, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलेचा गौरव केला.

दि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या नव्या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहनिर्माण आणि कामगार मंत्री प्रकाश महेता, शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे आणि खासदार शरद पवार आदी उपस्थित होते.

वांद्रे रेक्लमेशन येथील दि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या इमारतीच्या उद्घाटनानंतर श्री. मोदी यांच्या हस्ते या इमारतीत भरविण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटनही झाले. या उद्घाटनानंतर दि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या रंगशारदा येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले. त्यावेळी बोलताना त्यांनी कलेचा आणि कलाकारांचा गौरव केला.