समाज एकसंघ होणे गरजेचे-उपप्राचार्य भैरम

0
9

गणखैरा येथे राजाभोज जयती थाटात
गोरेगाव,दि.13-बहुसंख्य असलेला पोवार समाज विखुरलेल्या स्वरुपात असल्याने आजही समाजाची हवी तसी प्रगती झालेली नाही. त्यामुळे आता सर्व द्वेषभावना व ईष्या बाजूला सारून समाजाने एकसंघ होवून आपली एकता दाखविणे गरजेचे आहे, असे भावनिक आवाहन जगत महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस.एन.भैरम यांनी केले.
तालुक्यातील गणखैरा येथे क्षत्रिय राजाभोज जयंती महोत्सव समिती व क्षत्रिय पोवार समाजाच्या वतीने १२ फेब्रुवारी रोजी क्षत्रिय राजाभोज जयंती महोत्सवाचे आयोजन दुर्गा चौक परिसरात करण्ङ्मात आले होते. यावेळी ते कार्यक्रमच्ङ्मा दुसर्ङ्मा सत्रात  प्रमुख प्रवक्ते म्हणून बोलत होते. यावेळी समाज प्रवक्ते म्हणून भागचंद्र रहांगडाले तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.तिलक पारधी, रमेश पारधी, विनोद रहांगडाले, युवा पोवार समाज अध्ङ्मक्ष जलज येळे, संदीप बघेले, राजाराम बघेले महाराज, रवींद्र पारधी महाराज आदी उपस्थित होते.

चक्रवर्ती राजाभोज यांच्या तैलचित्राला माल्ङ्र्मापण करुन विधिवत कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.यावेळी भागचंद्र रहांगडाले यानी समाजाला एकसूत्र बांधण्ङ्मासाठी अशा कार्यक्रमाच्या आयोजनाची आवश्ङ्मकता असल्ङ्माचे सांगून चक्रवर्ती राजाभोज यांच्या जिवनावर प्रकाश टाकून सविस्तर मार्गदर्शन केले. समाजात वावरताना सामाजिक बांधिलकी जपत संमाजबांधवाच्ङ्मा हितासाठी झटण्ङ्माचे आवाहनही  केले.
सकाळच्या सत्रात दुपारी १२ वाजता जयंती महोत्सवाचे उद्घाटन भाजप महिला जिल्हाध्ङ्मक्षा सीता रहांगडाले यांच्या हस्ते जि.प.शिक्षण सभापती पी.जी.कटरे  यांच्या अध्ङ्मक्षतेखाली करण्यात आले. यावेळी विशेष अतिथी म्हणून माजी जि.प.सभापती मोरेश्वर कटरे, माजी सभापती चित्रकला चौधरी, समाजप्रवक्ते लिलेश रहांगडाले आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित अतिथींनी समयोचित मागर्दशन केले.  गावात राजाभोज रॅली काढण्ङ्मात आली. यावेळी समाजबांधवांनी उत्स्ङ्कूर्तपणे सहभाग घेतला.संचालन टोलीराम पारधी यानी आभार यशवंत पारधी यनी केले. आयोजनासाठी हितेंद्र पारधी, गौरीशंकर बघेले, प्रितम पारधी, प्रशांत चौधरी, राजेश गौतम, लिकेश रहांगडाले, दुर्गाप्रसाद पारधी, रवींद्रहास पारधी, सतीश पारधी, गणेश पारधी, दिगंबर पटले, हेमंत पारधी, विजय रहांगडाले यांच्ङ्मासह समाजबांधवांनी सहकार्य केले.