पत्रकार संरक्षण कायदा लवकरच लागू करणार – मुख्यमंत्री

0
20

मुंबई : पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकारांसाठी पेन्शन योजना लवकरच लागू करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली. यावेळी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, गृह राज्यमंत्री प्रा.राम शिंदे, मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रवीकिरण देशमुख, मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष अरविंद भानुशाली तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे पदाधिकारी आणि अन्य पत्रकार उपस्थित होते.