पेट्रोल 3 तर, डिझेल 2 रुपयांनी महागले

0
17
नवी दिल्ली – पेट्रोल 3.07 रुपये आणि डिझेल 1.90 रुपये प्रतीलिटर या दराने महागले आहे. ही नवीन दरवाढ बुधवारी मध्‍यरात्रीपासून लागू होणार आहे. दिल्लीमध्‍ये पेट्रोल 56.61 रुपयांऐवजी आता 59.68 रुपये या दराने मिळणार आहे. तर, डिझेल 46.43 रुपये लिटर मिळत होते. नवीन दरांप्रमाणे 48.33 रुपयात डिझेल मिळणार आहे.
4 मोठ्या शहरांमध्‍ये काय असतील पेट्रोल डिझेलचे दर..
– दिल्लीमध्‍ये पेट्रोल 56.61 रुपये प्रतिलिटर ऐवजी 59.68 प्रतिलिटर या दरात मिळेल.
– मुंबईत गुरुवारपासून प्रतिलिटर पेट्रोलसाठी 62.75 ऐवजी 65.79 रुपये मोजावे लागतील.
– कोलकातामध्‍येही एक लिटर पेट्रोलसाठी 61.35 ऐवजी 63.76 रुपये खर्च करावे लागतील.
– चेन्नईमध्‍ये प्रतिलिटर पेट्रोलचे दर 56.07 रुपयांऐवजी 59.13 रुपये असतील.