मुंबई पोलीस आयुक्तांनाच रहावे लागते पोलीस खानावळीच्या इमारतीत

0
11
मुंबई, दि. १९ – मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारून दोन महिने उलटून होत आले तरीही दत्तात्रय पडसलगीकर यांना हक्काचे घर मिळालेले नाही. मुंबई पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडत असून पोलीस आयुक्त पडसलगीकर मात्र अद्यापही वरळी येथील पोलिसांच्या खानावळीतील एका खोलीत राहत असल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने
दिले आहे. पडसलगीकर दिल्लीत दशकभराचा कालावधी घालवल्यानंतर मुंबई आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी पडसलगीकर १४ जानेवारी मुंबईत परतले आणि ३१ जानेवारी रोजी त्यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. मात्र त्यांच्यासाठी निवासस्थान उपलब्ध नसल्याने ते परत आल्यापासून पोलिसांसाठी असलेल्या खानावळीच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील एका खोलीत रहात असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.