कटेझरी पोलिस ठाण्यावर नक्षल्यांचा हल्ला?

0
11

विशेष प्रतिनिधी

धानोरा,दि.१९: धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम कटेझरी येथील पोलिस ठाण्यावर नक्षल्यांनी शुक्रवारच्या(दि.१८)रात्री हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने नक्षल्यांचा डाव उधळला गेला.

कटेझरी येथील शाळेत पोलिस ठाणे उभारण्यात आले आहे. ठाण्याच्या मागील भागात जंगल असून, परिसरात नक्षल्यांचा वावर असतो. काल रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी पोलिस ठाण्यावर गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आज सकाळी पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता तेथे दोन क्लेमोर माईन्स आढळून आले. मात्र, नक्षल्यांनी गोळीबार केला नाही, तर फटाके फोडले, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. यासंदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.फस्के यांना विचारणा केली असता, त्यांनी झेलिया परिसरातून काल नक्षलसाहित्य जप्त केल्याची माहिती त्यांनी दिली. कटेझरी परिसर अतिसंवेदनशील असून, तेथे पोलिस ठाणे सुरु करुन अवघे तीन महिने झाले आहेत.