मान्सून राज्यात ३ जूनला दाखल होणार

0
6

पुणे- दुष्काळात होरपळणा-या महाराष्ट्रात यावर्षी हवामान विभागाने नोंदवलेल्या अंदाजानुसार मान्सून लवकर म्हणजेच तीन जूनला दाखल होणार आहे.सर्वसाधारणपणे एक जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होतो. महाराष्ट्रात त्याचे सात जूनच्या दरम्यान आगमन होते. मात्र यंदा मान्सून तब्बल ३ ते ४ दिवस आधीच राज्यात दाखल होणार असून यंदाचे पर्जन्यमानही समाधानकारक असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तापमान १.५ ते १.६ अंश सेल्सियसने वाढले आहे.तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यंदा तापमानात मोठी वाढ झाली आहे. ती मान्सूनच्या पथ्यावर पडणार असून वाढलेले तापमान मान्सून लवकर दाखल होण्यास कारणीभूत ठरणार असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

पुणे वेध शाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान मालेगांव येथे ४२.४ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे १८.० अंश सेल्सिअस नोंदवले गेले.