छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार पोलीस अधिक्षक समीर शेख यांना

0
6

सातारा, दि. 28 :–  महाराष्ट्र शासना मार्फत सन 2018 करिता राज्य स्तरावरील  ग्राम/जिल्हा/विभाग या संवर्गा करिता  जाहिर करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नुकताच पोलीस अधिक्षक समीर शेख यांना देण्यात आला.

तसेच महाराष्ट्र शासना मार्फत सन 2018 करिता राज्य स्तरावरील  ग्रामपंचायत या संवर्गा करिता माण तालुक्यातील बिदाल   गावच्या   गौरी जगदाळे,   सुरेश जगदाळे,   प्रमोद जगदाळे, बापुराव जगदाळे  यांनी स्वीकारला.

सन 2018 या वर्षाकरिता छत्रपती शिवाजी महाराज पुरस्काराने रोहित बनसोडे गोंदवले खुर्द यांना तृतीय क्रमांकाने पारितोषिक देवून गौरविण्यात आले. तसेच सन 2019 या वर्षाकरीता सामाजिक वनीकरण विभाग  सातारा कार्यक्षेत्रातील राज्य स्तरावरील शैक्षणिक संस्था संवर्गाकरीता मुधोजी विद्यालय, फलटण या संस्थेस प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देवून गौरविण्यात आले तर स्व. दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, उंडाळे ता. कराड या संस्थेत तृतीय क्रमांक देऊन गौरविण्यात आले.

या परितोषिक वितरण कार्यक्रमास उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण डॉ. सुनिता सिंग यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.