जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

0
74

 

गोंदिया- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद गोंदिया द्वारे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यातील युवांचा गौरव करून त्यांना सन्मान करण्याचे ठरविण्यात आल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

याकरिता अर्ज दि.११ ते २० एप्रिल २०१६ या कालावधीत कार्यालयीन वेळेत वितरित करण्यात येतील. परिपूर्ण भरलेले अर्ज २१ एप्रिल पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया येथे स्वीकारले जातील.

जिल्हा युवा पुरस्कार (युवक व युवती स्वतंत्र), तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येईल.
पुरस्काराचे स्वरूप- गौरवपत्र, सन्मानचिन्ह, १० हजार रुपये रोख रक्कम, (प्रती युवक व युवतीसाठी).
प्रती संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह, ५० हजार रुपये रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.

निकष
अर्जदार हा महाराष्ट्रातील संबंधित जिल्ह्यामध्ये सलग ५ वर्षे वास्तव्यास असला पाहिजे. अर्जदार युवक/युवतीचे वय पुरस्कार वर्षातील १ एप्रिल रोजी १३ वर्षे पूर्ण व ३१ मार्च रोजी ३५ वर्षे पर्यंत असावे.
हा पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस विभागून दिला जाणार नाही.
सदर पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात येणार नाही. केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील (उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तिपत्र, चित्रफिती व फोटो).
अर्जदार संस्था, युवक व युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रियाशील कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. अर्जदार व्यक्तीचे कार्य हे स्वयंस्फूर्तीने केलेले असावे.
एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही.
केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाही.
अर्जदार संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम किंवा मुंबई पब्लिक टड्ढस्ट ?अ‍ॅक्ट १९५० नुसार पंजीबद्ध असावी. अर्जदार संस्था नोंदणी
झाल्यानंतर किमान पाच वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे.
अर्जदार/संस्थेच्या सदस्याचा पोलिस विभागाने प्रमाणित केलेला चारित्र्य दाखला (संबंधित क्षेत्रातील पोलिस स्टेशन) देणे आवश्यक राहील.
अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांनी कळविले आहे.