महिला लोकशाही दिन येत्या १८ ला

0
20

 

गोंदिया- महिलांच्या कोणत्याही विभागांशी संबंधित वैयक्तिक समस्या, गाèहाणी, अडीअडचणी ऐकून घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली येत्या १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात या महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकशाही दिनामध्ये जिल्ह्यातील बचतगट, महिलामंडळ, व इतर महिलांसाठी काम करणाèया संस्थांमध्ये काम करणाèया महिलांनी थेट सभेमध्ये येऊन आपल्या वैयक्तिक तक्रारी नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकाèयांनी केले आहे. तालुका स्तरावरील अर्ज हे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेकडे तालुकास्थळीच सादर करावा. जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाकरीता अर्जाचा नमुना हा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, अंगूर बगीचा रोड, गजानन कॉलनी गोंदिया यांचे कार्यालयात तर तालुका स्थळी संबंधित कार्यालयात निःशुल्क उपलब्ध असल्याचे प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे.