महाराष्ट्रात एलईडी बल्ब आता 85 रुपयांत

0
12
मुंबई(वृत्तसंस्था)- वीजेची बचत करणाऱ्या एलईडी बल्ब आता महाराष्ट्रात ग्राहकांना 100 रुपयांऐवजी 85 रुपयांना उपलब्ध होणार आहेत. एनर्जी एफशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने (ईईएसएल) ‘उन्नत ज्योती बाय अॅफॉर्डेबल एलईडीज् फॉर ऑल” अर्थात ‘उजाला‘ योजनेअंतर्गत नव्याने 54.90 रुपयांना हे बल्ब खरेदी केले आहेत.
 
प्रशासकीय खर्च, वितरण आणि जनजागृती खर्च व राज्यांमधील विशिष्ट कर गृहीत धरुन देशभरात एलईडी दिव्यांची किंमत 75 ते 95 रुपयांदरम्यान आहे. राज्यांतील विशिष्ट करांमुळे प्रत्येक राज्यात एलईडी दिव्यांची शेवटची किंमत वेगळी आहे. परंतु तेथील स्थानिक करांमुळे वितरणाची किंमतदेखील वेगवेगळी आहे, अशी माहिती ईईएसएलने सादर केलेल्या निवेदनात दिली आहे.
 
सरकारने यंदा वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी ऑनलाईन मंचाचा वापर केला आहे. त्यामुळे व्यवहारांसाठी लागणाऱ्या वेळ व पैशांची बचत झाली आहे. त्यामुळे अधिकाधिक निविदा सादर झाल्या व स्पर्धेतून दिव्यांची किंमत कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 1.35 कोटी एलईडी बल्बचे वितरण झाले आहे.