डान्स बार प्रकरणी 25 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

0
8
नवी दिल्ली, दि. १८ – डान्स बार परवान्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं आहे. राज्य सरकारने आदेशाचं पालन न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेशाची अंमलबजाणी का केली जात नाही ? असा सवाल राज्य सरकारला विचारला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला याप्रकरणी 25 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 2 मार्चला न्यायालयाने 14 दिवसांत डान्स बार परवाने देण्याचे आदेश दिले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच पालन न करण्याची ही सहावी वेळ असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं आहे.