३० हजारांची लाच घेताना एसडीओच्या स्वीय सहायकास अटक

0
6

देवरी(गोंदिया), : शेतकèयाकडून ३० हजार रुपयांची लाच घेताना देवरी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या स्वीय सहायकला रंगेहाथ अटक करण्यात आली. रविकांत हरिहरराव पाठक (वय ५४, रा. स्टेशन रोड भंडारा) असे या स्वीय सहायकाचे नाव आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज, सो‘वारी देवरी उपविभागीय अधिकारी कार्यालयात केली.
देवरी तालुक्यातील पवनी येथे तक्रारदार शेतकर्याची गट क्र‘ांक ४४, प.ह. २८ येथे १.४८ हेक्टर आर जमीन आहे. या जमिनीवर तक्रारदार शेतकèयाच्या भावाच्या नावाने फेरफार घेण्यात आले होते. या विरूद्ध तक्रारदाराने देवरी तहसील कार्यालयात प्रकरण दाखल केले होते. मात्र, विरोधात निकाल लागल्याने तक्रारदार शेतकèयाने या आदेशाविरूद्ध उपविभागीय अधिकारी कार्यालय देवरी येथे ५ डिसेंबर २०१३ ला अपिल दाखल केले होते. या अपिल प्रकरणात तक्रारदार शेतकèयाच्या बाजुने निकाल लागला. त्यामुळे या शेतकèयाने उपविभागीय अधिकारी कार्यालय गाठले व तिथे स्वीय सहायक रविकांत पाठक याला भेटले. त्याने निकाल तुझ्या बाजुने लागल्याचे सांगून निकालाची प्रत देण्याकरिता ३० हजार रुपये द्यावे लागतील, असे सदर शेतकèयाला म्हटले. परंतु, ही रक्कम देण्याची इच्छा नसल्याने शेतकèयाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे ६ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली. त्यानुसार, पथकाने ७ एप्रिलला प्रकरणाची पडताळणी केली. त्यानंतर सोमवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयात सापळा रचला. या वेळी स्वीय सहायक रविकांत पाठकला तक्रारदार शेतकèयाकडून ३० हजार रुपये घेताना रंगेहाथ अटक केली. आरोपी पाठकविरूद्ध देवरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त संजय दराडे, अपर पोलिस अधीक्षक राकेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक दिनकर ठोसरे, पोलिस निरीक्षक प्रमोद घोंगे, प्रमोद चौधरी, सहायक फौजदार दिवाकर भदाडे, रंजीत बिसेन, डिगाबर जाधव, देवानंद मारबते यांनी केली.