छगन भुजबळ आणि समीर भुजबळांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

0
12

मुंबई, दि. 27 –  महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळआणि समीर भुजबळ यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांनाही 11 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान न्यायालयाने छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ आणि अन्य 34 जणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे.