नक्षल्यांनी जाळली पोखलन मशीन

0
24

 

गडचिरोली-जिल्हयातील गुडेम येथे पुल बांधकामाच्या कामावर असलेली पोखलंन मशीन सह साहित्य जाळल्याची घटना घडली आहे.लाहोरी जवळसध्या आंतरराजीय पूलाचे बांधकाम वेगाने सुरु आहे.वांगेपल्ली गुडेम येथे नक्षल्यांनी रात्री डाव साधून पूल बनविण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्याला आग लावल्याने मोठे नुकसान झाले आहे.या कामावरील १ पोकलेन मशीन १ ट्रक्टरसह टिप्पर माओवाद्यांनी जाळले. या घटनेत एक कोटी पेक्षा जास्तीचे नुकसान झाले आहे

 गुडेम-वांगेपल्ली या महाराष्ट्र-तेलगंणा या दोन राज्यांना जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम प्राणहिता नदीवर सुरु आहे. या बांधकामासाठी पोकलेन, ट्रॅक्टर, ट्रक व अन्य यंत्रसामग्री वापरण्यात येत आहे. मात्र काल रात्री सशस्त्र नक्षल्यांनी पोकलेन व अन्य यंत्रसामग्रीला आग लावली. यामुळे संबंधित कंत्राटदाराचे मोठे नुकसान झाले असून, मजुरांमध्ये भीती निर्माण झाली आहे.