संगमनेरमध्ये पत्रकार प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

0
14
 (प्रतिनिधी)
संगमनेर -ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकारितेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र दिनानिमित्त प्रशिक्षण शिबीराचे संगमनेर मध्ये आयोजन करण्यात आले आहे. संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई या संस्थेच्या संगमनेर शाखेच्यावतीने हे शिबीर पार पडत असून शिबीरास मार्गदर्शन करण्यासाठी माहीती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक देवेंद्र भुजबळ, दैनिक सार्वमतचे संपादक अनंतराव पाटील, दैनिक नवा मराठाचे संपदक व अ. नगर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाषराव गुंदेचा हे उपस्थित रहाणार आहेत. संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. जावाहर मुथा यांचा पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात येणार असल्याची माहीती संस्थेचे अध्यक्ष किसन भाऊ हासे, सचिव अजय जाजू व समन्वयक नरेंद्र लचके यांनी दिली आहे.
रविवार दि. 1 मे 2016 रोजी सकाळी 9.30 वाजता दैनिक युवावार्ताच्या सभागृहात होणार्‍या प्रशिक्षण शिबीरासाठी युवक-युवतींना तसेच पत्रकारीतेत करीअर करु इच्छिणार्‍या व्यक्तींनी उपस्थित रहावे.
अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकार बंधू-भगिणींना या शिबीरास उपस्थित राहून मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे अवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे