विजांचा कडकडाट,अनेक घरांची पडझड : रब्बी पिकांना फटका

0
27

गोंदिया/गोरेगाव,दि.28  : गेले दोन महिने तळपत्या उन्हाचा चटका सहन करीत असतानाच बुधवारच्या(२७) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास निसर्गाने रौद्ररूप धारण केले. काही क्षणात विजांचा कडकडाट, मेघ गर्जना आणि पावसाला सुरुवात झाली. रिमझीम ते गारपीठ पडेपर्यंत पाऊस झाला.गोरेगाव तालुक्यातील दवडीपार,सटवा,गोंदिया तालक्यातील धापेवाडा,झिलमिली परिसरात अचानक पडलेल्या गारपीठीमूळे रबी पिकाचे लाखोचे नुकसान झाले आहे.  गारपिटीसह आलेल्या पावसामुळे गोंदिया तालुक्यात अंदाजे १९ ते 20 हेक्टर तर गोरेगाव तालुक्यातील दवडीपार परिसरातील १५ ते २० हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.गोंदिया तालुक्यातील कामठा येथील शेतकरी प्रतिष्ठित  भाजीपाले यांच्या ७-८ एकरातील फळबागाचेही मोठे नुकसान झाले आहे.उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव तसेच गोरेगावचे तहसिलदार कल्याण डहाट यांनी पंचनामा सुरु असल्याचे सांगितले.
गोरेगावचे तहसिलदार कल्याण डहाट यांना नुकसान झालेल्या शेतकर्यांनी तहसिल कार्यालय गाठून निवेदन दिले तसेच धानाच्या पेंड्या दाखविल्या त्यावेळी जीडीसीसीचे संचालक रेखलाल टेभरे,तंटामुक्त समिती अध्यindexqक्ष हिरदीलाल कटरे,माजी पस सदस्य साहेबलाल कटरे,ग्रा.प.सदस्य माणिकचंद कटरे,उपसरपंच पुनेश्वर राऊत,अशोक कोल्हटकर,हनवत मेश्राम,नागो सोनावने,धोंडू सोनवाने,श्रीराम राऊत,नंदकिशोर गणवीर यांच्यासह गोरेगावचे पोलिस निरिक्षक रविंद्र शिंदे यावेळी उपस्थित होते.गणखैरा परिसरातील नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी सटवाचे सरपंच रमेश ठाकुर,ड्व्वाचे सरपंच जगदिश बोपचे,उपसरपंच के.टी.राऊत,भागचंद रहागंडाले,माजी प.स.सदस्य युवराज रहागंडाले यांनी केली आहे.
गोंदिया तालुक्यात १२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. नवरगाव, आसोली, रावणवाडी परिसराला वादळ आणि पावसाचा फटका बसला.मुडीकोटा परिसराला बुधवारी आलेल्या अवकाळी पावसाचा व गारपीटचा फटका बसला. धान पिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक घरांवरील पत्रे उडाली. झाडे तुटून पडली. विजेच्या तारा तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला.
आमगाव येथे रात्री साडेअकरा ते दीड वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. अनेक झाडे पडली. घरांवरील टिनाचे पत्रे उडाले. रात्री ११ वाजतापासून खंडीत झालेला पुरवठा आज, गुरुवारी दुपारपर्यंत सुरळीत झाला नाही.
देवरी : वादळी वाèयासह तालुक्यात तुरळक पाऊस झाला. त्यामुळे अनेक झाडे पडली. कोणत्याही प्रकारची प्राणहानी झाली नाही.
सडक अर्जुनी  तालुक्यात रब्बी हंगामातील धान आणि पालेभाज्यांच्या पिकाचे नुकसान झाले. विजेच्या तारांवर झाडे पडल्यामुळे तालुकावासींना अख्खी रात्र अंधारात काढावी लागली.
गोरेगाव  वादळी वाèयाने व गारपीटीने सटवा गावाला झोडपले. बुधवारी रात्री १२ वाजता अचानक जोरदार वारा सुरू झाला. चक्रीवादळ आले. या वादळात गावातील सुमारे ८० टक्के घरांची व गोठ्यांची छपरे उडाली. व्रृध्दाच्या सांगण्यानुसार गेल्या ८० ते ९० वर्षातील हे सर्वात मोठे चक्रीवादळ होते. कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही. गोठ्यावरील टिनाचे पत्रे पडल्याने अनेक जनावरे जखमी झाली .रात्रभर विजपुरवठा खंडीत होता.