कटंगी मध्यमप्रकल्पग्रस्तांचा महाराष्ट्र दिनी आत्मदहनाचा इशारा

0
7

जिल्हा प्रशासनासोबतची चर्चा फिस्कटली
गोरेगाव- तालुक्यातील कंटगी मध्यम प्रकल्पाच्या बांधकामानंतर त्या 28 शेतकयांच्या जमिनी बुडीत क्षेत्रात गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.त्यातच शेतकर्ंयाच्या जमिनिचा मोबदला अद्यापही त्यांना न मिळाल्याने शेतकरी कुटुंबावर उपासमारीची पाळी आल्याने अखेर त्यानी महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी सामुहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
विशेष म्हणजे काँग्रेसचे सरकार असताना तत्कालीन आमदार व विद्ममान मंत्री राजकुमार बडोले व तत्कालीन भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी कंटगी व कलपाथरी प्रकल्पासाठी निधी आणल्याचे अनेकदा वृत्त दिले होते.आत्ता त्यांच्याच पक्षाची सरकार असतानाही त्या 28 शेतकर्याना न्याय न मिळाल्याने अखेर कटंगी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीला आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागला आहे.विशेष म्हणजे या समितीचे प्रमुख हे भाजपचे सहकार आघाडीचे नेते असून त्याना आपल्याच सरकारच्या विरोधात शेतकरी हितासाठी आत्महदहन आंदोलनाचा इशारा देण्याची वेळ आली आहे.प्रकल्पग्सत बाधीत शेतकयासोबत आज गोरेगावचे तहसीलदार कल्याण डहाट यांनी चर्चेसाठी बोलावले होते.परंतु ती बैठक सुध्दा निष्पळ ठरली त्यांनतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या उपस्थितीत बैठक दुपारी घेण्यात आली.या बैठकीला
गोरेगावचे तहसिलदार कल्याण डहाट ,संघर्ष समितीचे प्रमुख व जीडीसीसीचे संचालक रेखलाल टेभरे,शेतकरी हनवत मेश्राम,नागो सोनावने,धोंडू सोनवाने,श्रीराम राऊत,नंदकिशोर गणवीर यांच्यासह गोरेगावचे पोलिस निरिक्षक रविंद्र शिंदे ,कार्यकारी अभियंता वैद्य आदी उपस्थित होते.याबैठकितही तोडगा न काढता पुढची तारीख देऊन आंदोलन स्थगित करण्याची विनंती करण्यात आली.परंतु प्रशासन आपल्यासोबत टाईमपास करण्याचे धोरण राबवत असल्याचे स्पष्ट करीत कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्र दिनी सामुहिक आत्मदहन आंदोलन करण्यात येईल असे टेंभरे यांनी स्पष्ट केले आहे.