राज्यातील 132 प्रकल्पासाठी निधी देण्यास तत्वतः मंजुरी

0
8


मुबंई,दि.3-प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा आढावा घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते.त्यात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीला मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती, केंद्रीय भृपुष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे जलसपंदा व पाणीपुरवठा मंत्री गिरीश महाजन
,अर्थमंत्री  सुधीर मुनगंटीवार, विजय शिवतारे उपस्थित होते. बैठकीत विदर्भ आणि मराठवाड्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील 132 प्रकल्प विशेष प्रकल्प म्हणून पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यासाठी 7188 कोटी रूपयांना मान्यता प्रदान करण्यात येईल, असे भरीव आश्‍वासन केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांनी यासंबंधीची विनंती आज प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या आढावा बैठकीत केली होती. या 132 पैकी 98 प्रकल्प हे विदर्भातील (4098 कोटी) असून 34 प्रकल्प हे मराठवाड्यातील (3090 कोटी) आहेत. गोसिखुर्द या राष्ट्रीय प्रकल्पाचे काम येत्या 3 वर्षांत पूर्ण करण्यासाठी भविष्यातील आराखडा निश्‍चित करण्याच्या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारमधील अधिकार्‍यांची एक संयुक्त समिती स्थापन करण्यात आली असून, ते येत्या 15 दिवसांत आपला अहवाल सादर करतील. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत असलेल्या एआयबीपीचे 26 प्रकल्प पूर्ण करताना त्यात 60:40 या प्रमाणात निधीची उपलब्धता व्हावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. ती उमा भारती यांनी तत्त्वत: मान्य केली. अर्वषणप्रवण भागातील 67 प्रकल्प पूर्ण करणे, त्यासाठी 2000 कोटी उपलब्ध करून देणे आणि तापी मेगा रिचार्ज प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येईल, अशीही हमी त्यांनी दिली.