मान्सून 3-4 दिवसांत अंदमानला धडकणार !

0
8

पुणे – : दुष्काळाचे चटके सहन करणार्‍या महाराष्ट्रावर वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली असून मान्सून लवकरच दाखल होणार आहे. येत्या 3 ते 4 दिवसांत मान्सून अंदमानला धडकणार आहे असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. अंदमानला मान्सून पोहोचल्यानंतर त्याची पुढची वाटचालही महाराष्ट्राच्या दिशेनं असणार आहे.

सलग दुसर्‍या वर्षीही महाराष्ट्र दुष्काळाला सामोरं जातोय. मराठवाड्यासह विदर्भ आणि खान्देशमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झालीये. मात्र, यंदा अल निनो वादळाचा प्रभाव ओसरल्यामुळे यंदा 106 टक्के पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला. या  बातमीनंतर आता पुणे वेधशाळेनंही मान्सूनबद्दल चांगली बातमी दिली. येत्या 3 ते 4 दिवसांत मान्सून अंदमानद्वीपमध्ये दाखल होणार आहे अशी माहिती पुणे वेधशाळेच्या संचालकी सुनीतादेवी यांनी दिली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. जो मान्सूनच्या वाटचालीला पुरक असेल. त्यामुळे साधारणत:हा 16 ते 17 मेला मान्सून दाखल होण्याचं भाकित पुणे वेधशाळेनं वर्तवलं.  राज्यात यंदा 27 टक्के अधिक पाऊस पडणार आहे. पावसाचा पट्टा असलेल्या कोकणात 27.20 टक्के जास्तीच्या पावसाचा अंदाज आहे. एवढंच नाहीतर जुलै आणि ऑगस्टमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.