पुणे मेट्रोला तात्काळ मान्यता देऊ- मुख्यमंत्री

0
8

पुणे, दि. 13- पुणे मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारच्या पब्लिक इनव्हेस्टमेंट बोर्डकडून मंजुरी मिळताच राज्य शासन तत्काळ मान्यता देईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे महानगरपालिकेशी निगडीत असणाऱ्या प्रलंबित प्रश्नांबाबत येथील विधान भवन येथे बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी खासदार अनिल शिरोळे, शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीमती अनु आगा, आमदार सर्वश्री भीमराव तापकीर, अनिल भोसले, जगदीश मुळीक, विजय काळे, सुरेश गोरे, जयदेव गायकवाड, माधुरी मिलाळ, मेधा कुलकर्णी, नीलम गोऱ्हे, दीप्ती चवधरी , मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार, जिल्हाधिकारी सौरभ राव आदी उपस्थित होते.