निरंकारी पंथाचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांचं अपघाती निधन

0
12

मॉन्ट्रियल (कॅनडा) : निरंकारी संप्रदायाचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांचं अपघाती निधन झालं आहे. कॅनडाच्या मॉन्ट्रियल शहरात एका कार्यक्रमासाठी जात असताना हरदेव सिंह यांच्या कारचा अपघात झाल्याने त्यांचं निधन झाल्याचं कळतंय.  ते 62 वर्षांचे होते. देशासह जगभरात निरंकारी पंथाची महती पोहोचवण्यात बाबा हरदेव सिंह यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती.बाबा हरदेव सिंह यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1954 रोजी त्यांचा दिल्लीत त्यांचा जन्म झाला. हरदेव सिंह यांच्या वडिलांच्या हत्येनंतर 1980 मध्ये हरदेव सिंह निरंकारी संप्रदायाचे सर्वेसर्वा झाले.बाबा बटू सिंह यांनी 1929 मध्ये संत निरंकारी मंडळाची स्थापना केली होती. जगभरातील 27 देशांमध्ये सध्या हरदेव सिंह यांच्या निरंकारी पंथानच्या 100 हून अधिक शाखा आहेत.