चेन्नईत विक्रमी पावसानंतर पूराची भीती

0
10

चेन्नई – तमिळनाडूमध्‍ये बुधवारी(ता.18) मुसळधार पाऊस झाला. चेन्नईत 48 तासांमध्‍ये विक्रमी पाऊस पडला आहे. यामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे. ट्राफीक, 56 विमानांच्या सेवा प्रभावित झाल्या आहेत. लोकांना गेल्या वर्षीप्रमाणे पूर येण्‍याची भीती वाटत आहे. कारण हवामान विभागानुसार, चेन्नईपासून 70 किमी लांब बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्ट तयार झाला असून पुढील दोन दिवसात त्याचे चक्रीवादळीत रुपांतर होऊ शकते. आसाममधील पाऊस आणि भूस्खलनामुळे गेल्या 24 तासांमध्‍ये 11 लोकांचा मृत्यू झाला आहे.