कदमवर गुन्हा दाखल करा… पोलिस अधीक्षकांना निवेदन

0
8

नांदेड-रस्त्यातील खड्ड्या संदर्भात बातमी प्रसिद्ध केल्याच्या कारणावरुन एकमतचे आवृत्ती संपादक चारुदत्त चौधरी यांना मनपाचा अभियंता गिरीष कदम यांनी अश्लिल शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी शनिवारी सकाळी दिली होती. याचा तीव्र निषेध करीत मराठी पत्रकार संघाच्यावतीने कदम याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलिस अधीक्षक संदीप डोईफोडे यांच्याकडे केली आहे. चौधरी यांनी कदम यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. झाल्या प्रकाराची मराठी पत्रकार संघास चौधरी यांनी माहिती दिली. त्यावेळी कदम यांचा मराठी पत्रकार संघाच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला. यानंतर शनिवारी सायंकाळी बातम्यामधून वास्तव समाजापुढे मांडणाऱ्या आणि वृत्तपत्राची गळचेपी करुन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या अभियंता गिरीष कदम याच्यावर ाकाळ गुन्हा दाखल करावा, अशी आग्रही मागणी करणारे निवेदन मराठी पत्रकार संघाच्यावतीने पोलिस अधीक्षक संदीप डोईफोडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन देण्यात आले. यावेळी बातमी काय आहे, त्यात काय उल्लेख करण्यात आला आहे याची खातरजमा करुन संदीप डोईफोडे यांनी जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या गिरीष कदम याच्यावर तात्काळ एनसी दाखल करण्यात येईल असे आश्वासन पत्रकार संघाच्या शिष्टमंडळास दिले. 

निवेदन देतांना जेष्ठ पत्रकार संजीव कुळकर्णी, राम शेवडीकर, मराठी पत्रकार संघाचे विभागीय सचिव विजय जोशी, मराठी पत्रकारसंघाचे अध्यक्ष प्रकाश कांबळे, संपादक शंतनु डोईफोडे, संपादक केशव घोणसे पाटील, जेष्ठ पत्रकार विनायक एकबोटे, गोवर्धन बियाणी, एकमतचे आवृत्ती प्रमुख चारुदत्त चौधरी, प्रल्हाद उमाटे, योगेश लाठकर, शिवराज बिच्चेवार, राजू गिरी, प्रविण कंधारे, आनंद कुलकर्णी, कृष्णा उमरीकर, सतीश मोहिते, सूर्यकुमार यन्नावार, विश्वनाथ देशमुख, अमृत देशमुख, कालिदास जहागिरदार, महेश राजे, भुजंग चव्हाण,अंकुश सोनसळे, अनुराग पवळे, संभाजी सोनकांबळे, सुनिल पारडे, विनायक कामठेकर, प्रशांत चलिंद्रवार, प्रशांत गवळे, सिद्धार्थ राजभोज, काशिनाथ इप्पेवार, गणेश कांबळे, राहुल गजेंद्रगडकर, संगमेश्वर बाचे, पवनसिंह बैस, मुजीब शेख, संजय सूर्यवंशी, प्रविण देशमुख, करणसिंह बैस, ज्ञानेश्वर सुनेगावकर, नरेंद्र गडप्पा आदीसह अनेकांची उपस्थिती होती.