राष्ट्रवादीच्या आमदारांनी लाटले अण्णाभाऊ साठे महामंडळातील कोट्यावधी रुपये

0
6

मुंबई – भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी आज प्रसार माध्यमांसमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदारांनी अण्णाभाऊ साठे महामंडळातून कोट्यावधी रुपये लाटल्याचा आरोप केला आहे.

किरीट सोमय्या यांनी यावेळी या घोटाळ्यातील राष्ट्रवादीच्या माजी आमदारांची नावे जाहीर केली असून यामध्ये हे पैसे दत्तात्रय भरणे, दिलीप बराटे,उदयसिंग राजपूत, चंद्रकांत दानवे, सुरेश धस,बदामराव पंडित, राहुल मोठे, प्रदीप नाईक, शंकर अण्णा धोंगडे, प्रकाश साळुंखे यांनी लाटल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

या सर्वांचे मास्टरमाईड अजित पवार असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. एकाच दिवशी २५ हजार रुपये धनादेशांनी पैसे काढले. अश्या ४२५ लोकांची नावे किरीट सोमय्या यांनी जाहीर केली आहेत. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा घोटाळा झाला आहे. ४० हजार दलित लोकांच्या नावाने ९५ कोटी रुपये राष्ट्रवादीच्या आमदारांनी काढले. हे पैसे राष्ट्रवादीने निवडणुकीत वापरले आहेत, असाही आरोप किरीट सोमय्या यांनी केला.