राज्य कामगार विमा योजनेसाठी सर्वतोपरी सहाय्य – केंद्रीय कामगार मंत्री

0
8

मुंबई, दि. १5 : केंद्र शासनाच्या राज्य कामगार विमा महामंडळामार्फत या
योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला सर्वतोपरी सहाय्य उपलब्ध करून
दिले जाईल. या योजनेंतर्गत महाराष्ट्रात कामगारांच्या आरोग्य रक्षणासाठी
अधिक दवाखाने सुरू करण्यात येतील, असे केंद्रीय कामगार मंत्री बंडारु
दत्तात्रय यांनी येथे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री श्री. बंडारु दत्तात्रय
यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी राज्य
कामगार विमा योजनेतून चालविल्या जाणाऱ्या दवाखान्यांच्या सद्यस्थिती आणि
विकासाबाबत बैठक झाली, त्यावेळी मंत्री श्री. बंडारु दत्तात्रय बोलत
होते. यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, कामगार
मंत्री प्रकाश महेता, कामगार राज्यमंत्री विजय देशमुख, सार्वजनिक आरोग्य
राज्यमंत्री प्रा. राम शिंदे, केंद्र शासनाच्या कामगार विभागाचे अतिरिक्त
सचिव हिरालाल सामरीया, केंद्र शासनाच्या राज्य कामगार विमा महामंडळाचे
वैद्यकिय आयुक्त डॉ. आर. के. कटारीया, राज्याच्या वित्त विभागाचे अप्पर
मुख्य सचिव डी. के. जैन, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव
श्रीमती सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी, सचिव
मिलींद म्हैसकर यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.