पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघातील मतदान शांततेत; सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ६०.२२ टक्के मतदान

0
5

मुंबई, दि. 20 : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदार संघांमध्ये आज दि.19 एप्रिल 2024 रोजी शांततेत मतदान पार पडले असून पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 60.22 टक्के मतदान झाले असल्याची माहिती  मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय  मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे : ९-रामटेक ५८.५० टक्के, १०-नागपूर ५३.७१ टक्के, ११-भंडारा- गोंदिया ६४.०८ टक्के, १२-गडचिरोली- चिमूर ६७.१७ टक्के आणि १३- चंद्रपूर ६०.०३ टक्के.