७ जुलै रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार

0
7

मुंबई – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारापाठोपाठ लगेचच राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असून येत्या ७ जुलै रोजीचा मुहूर्त राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी ठरविण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा विस्तार करण्यात येणार असे बोलले जात होते. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात एकूण ९ जण आपल्या मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये भाजपच्या ४, शिवसेनेच्या दोन आणि मित्रपक्षांच्या तीन नेत्यांचा समावेश असेल.

यावेळेच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, सुधाकर भालेराव, संभाजी पाटील, पांडुरंग फुंडकर, डॉ संजय कुटे, मदन येरावर, जयकुमार रावल, हरिभाऊ जावळे यांची नावे चर्चेत असून यांच्यापैकी चौघांना मंत्रिपद मिळणार आहे. तर मित्रपक्षांच्या तीन मंत्रिपदांवर महादेव जानकर, विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे शिवसेनेला देण्यात येणा-या दोन मंत्रिपदांसाठी गुलाबराव पाटील आणि अर्जुन खोतकर यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, ही खाती सध्याच्या मंत्रिमंडळातील शिवसेना नेत्यांकडील अतिरिक्त खाती असल्याचे म्हटले जात आहे.