तीन उच्च न्यायालयांचे नव्याने नामकरण

0
12

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन उच्च न्यायालयांचे नव्याने नामकरण करण्यात आले असून बॉम्बे हायकोर्टाचे नामकरण आता मुंबई उच्च न्यायालय असे करण्यात आले आहे. यापुढे आता बॉम्बे हायकोर्ट अधिकृतपणे मुंबई उच्च न्यायालय, मद्रास हायकोर्ट आता चेन्नई उच्च न्यायालय तर कलकता हायकोर्ट आता कोलकाता उच्च न्यायालय म्हणवले जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.१९९५ मध्ये बॉम्बे शहराचे मुंबई, १९९६मध्ये मद्रासचे चेन्नई तर २००१मध्ये कलकताचे कोलकाता असे अधिकृतपणे नामकरण करण्यात आले पण १५ ते २० वर्ष उलटल्यानंतरही उच्च न्यायालयांची नावे बदलण्यात आली नव्हती.