फडणवीस सरकारचे नवे खाते वाटप जाहीर

0
26

मुंबई,दि.09-राज्याच्या मंत्रीमंडळाचा शुक्रवारी विस्तार करण्यात आला.परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खातेवाटप करण्यास शनिवारचा दिवस घ्यावा लागला.त्यातही मोठ्या मंत्र्यांनी आपली खाती सोडायला आणाकानी केल्यानंतर विनोद तावडे व पंकजा मुंडे यांना धक्का देत त्यांच्याकडील महत्वाची खाती काढून नव्या कॅबीनेट मंत्र्यांना देऊन रशीयाकडे रवाना झाले.आज शनिवारी राज्य मत्रिमंडळाचे नवे खाते वाटप जाहीर करण्यात आले.
फडणवीस सरकारच्या खाते वाटपामध्ये चंद्रकांत पाटील आणि गरीश महाजन यांच्याकडे मह्त्वाची खाती देण्यात आली आहेत. तर विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्का दिला आहे. पंकजा मुंडे यांच्याकडील जलसंधारण खाते तर विनोद तावडे यांच्या कडील वैद्यकीय शिक्षण खाते काढून घेण्यात आले आहे.
नवीन खातेवाटप पुढील प्रमाणे-
चंद्राकांत पाटील – महसूलमंत्री,
गिरीश महाजन – वैद्यकीय शिक्षण मंत्री,
पांडुरंग फुंडकर – कृषीमंत्री,
प्रा.राम शिंदे – जलसंधारणमंत्री,
चंद्रशेखर बावनकुळे – ऊर्जा व उत्पादन शुल्कमंत्री,
सुभाष देशमुख- वस्त्रोद्योग, पणन व सहकारमंत्री,
गुलाबराव पाटील – सहकार राज्यमंत्री,
रविंद्र चव्हाण – बंदरे, आरोग्यमंत्री राज्यमंत्री,
महादेव जानकर – पशु दुग्ध विकासमंत्री (कॅबिनेट)
अर्जुन खोतकर – पशुदुग्ध राज्यमंत्री,
संभाजी निलंगेकर – कामगार, कौशल्यविकासमंत्री.