चंद्रपूरातील कोठारीजवळील नाल्यात कोसळली;चौघेचेही मृतदेह आढळले

0
16

1
चंद्रपूर,दि.10- शालेय साहित्य खरेदीसाठी चंद्रपूरला येत असलेल्या संस्थाचालकासह शिक्षकाची चारचाकी गाडी कोठारी ते येनबोडी दरम्यान किन्ही पुलावरून जातांना नाल्यात कोसळल्याने कारमधील चौघेजण बेपत्ता झाले होते.ही घटना शनिवारी (ता. 9) पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली.घटनेची माहीत होताच तुकूमचे पोलिस पाटील मारोती बंडू आलाम यांनी सहायक पोलिस निरीक्षक पान्हेकर यांना माहिती दिली आणि पोलिसांनीही लगेच घटनास्थळ गाठून शोध मोहिम राबविण्यास सुरवात केली.पाण्यात वाहून गेलेली कार पुलापासून 30 ते चाळीस फुटावर अडकली होती. मात्र, कारमधील चौघेही बेपत्ता असल्याने त्याची शोधमोहीम अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय धीवरे व अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात सुरु होती आत्ताच हाती आलेल्या सुत्रांनुसार मृतदेह तपासपथकाच्या हाती लागले असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
कोठारी येथे सचिन गोविंदवार यांची शाळा आहे. शालेय साहित्य खरेदीसाठी शनिवारी त्यांच्यासोबत सुवर्ण राजूरकर, पूजा राजूरकर आणि करण अरुण कावळे हे शिक्षक एमएच 34 ए. एम. 3153 क्रमांकाच्या कारने चंद्रपूरसाठी निघाले. चंद्रपूर मार्गावर किन्ही नाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने हा नाला दुथडी भरून वाहत होता. नाल्याजवळ येताच सचिन गोविंदवार यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार क्षणातच खाली कोसळली. घटना माहीत होताच तुकूमचे पोलिस पाटील मारोती बंडू आलाम यांनी सहायक पोलिस निरीक्षक पान्हेकर यांना भेटून माहिती दिली. तत्काळ पोलिस घटनास्थळी पोहोचले. पाण्याचा प्रवाहात चौघेही वाहून गेले. कार पुलापासून 30 ते चाळीस फुटावर अडकली होती. मात्र, कारमधील चौघेही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.
rrr
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळला. भामरागड तालुक्‍यातील पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड-आल्लापली मार्ग आज दुसऱ्यादिवशीही बंद होता. अहेरीजवळील गडअहेरी नाल्यावर पूर असल्याने देवलमारी (ता. अहेरी) मार्ग बंद आहे. एटापल्ली तालुक्‍यात बांडे नदीचा पूर अद्यापही ओसरला नसल्याने जांभिया -गट्टा मार्ग बंद आहे. जिल्ह्यात आजही पावसाची रिपरिप सुरूच आहे. पावसामुळे शंभर गावांचा संपर्क तालुका मुख्यालयाशी तुटला आहे. गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने जिल्ह्यातील कठाणी, वैनगंगा नदीला पूर आला. चामोर्शी तालुक्‍यातील एका नाल्यात वाहून जाणाऱ्या व्यक्तीला वाचविण्यात यश आले.