ज्येष्ठ अभिनेते नंदू पोळ कालवश

0
10

पुणे- मराठी रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलावंत नंदू पोळ यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. पुण्यातील प्रयाग या खासगी रुग्णालयात पोळ यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
घाशीराम कोतवाल या नाटकात आणि गाढवाचं लग्न या चित्रपटात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.
बालवयातच नंदू पोळ यांनी ‘साष्टांग नमस्कार’ नाटकापासून अभिनयाचा प्रवास सुरू केला. ‘घाशीराम कोतवाल’ मधील वामनमूर्ती, ‘सामना’मधील
मास्तरांना सेवा देणारा वेटर, ‘गाढवाचं लग्न’ चित्रपटातील राजा, छोटय़ा पडद्यावरील ‘नाजूका’ मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेला ‘धर्म्या’.. अशा पोळ यांच्या अनेक भूमिका गाजल्या.
पडद्यामागेही त्यांनी खूप कार्य केले आहे. थिएटर अकादमी पुण्याचे ते संस्थापक सदस्य होते. ते ध्वनीमुद्रण तंत्रज्ञ होते तसेच त्यांचा स्वत:चा स्टुडिओसुद्धा होता.