प्रिती बंडे(नागपूरे) यांना आचार्य पदवी

0
10

गोंदिया,दि.28- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या समाजविज्ञान शाखेतर्गंत अर्थशास्त्र विषयात विदर्भातील 11 जिल्ह्याचा अभ्यास करुन सादर केलेल्या संशोधन अहवाल पुर्ण केल्याबद्दल गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्व.श्री गिरिजाशंकर नागपूरे यांच्या पुत्रवधू प्रिती आशिष नागपूरे यांना आचार्य पदवी मिळाली आहे.प्रिती बंडे यांना वर्धा जिल्ह्यातील कारंजा(घा)येथील मा्ॅ्डेल कला व वाणिज्य महाविद्यालयाचे डाॅ.संजय धनवटे यांनी मार्गदर्शन केले.प्रिती यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक धनवटे,वडील स्व.ईश्वरसिंग बंडे यांना दिले आहे.यासाठी आई मिरा बंडे,पती आशिष नागपूरे,बहिण राणी,भाऊ अमित,मुलगा राजवीर यांच्यासह नातेवाईकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.