न्या. डॉ. मंजूला चेल्लूर यांनी घेतली मुख्य न्यायाधीशपदाची शपथ

0
14

मुंबई, दि. २२ – कलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावरून बदलीवर आलेल्या न्या. डॉ. मंजुला चेल्लूर यांनी आज राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी समारंभात मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी न्या. डॉ. मंजुला चेल्लूर यांना पदाची शपथ दिली.
राज्यपालांच्या पत्नी विनोदा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान सभेचे सभापती हरिभाऊ बागडे, कॅबिनेट मंत्री विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, राम शिंदे, जयकुमार रावल, महादेव जानकर, राज्यमंत्री दीपक केसरकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या काळजीवाहू मुख्य न्यायाधीश विजया कापसे ताहिलरामाणी, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, वरिष्ठ शासकीय अधिकारी व इतर मान्यवर शपथविधीला उपस्थित होते. सुरुवातीला मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी मुख्य न्यायमुर्तींच्या नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखविली. राष्ट्रगीताने शपथविधीची सुरुवात व सांगता झाली.
दिनांक ५ डिसेंबर १९५५ रोजी बल्लारी येथे जन्मलेल्या मंजुळा चेल्लूर यांनी बल्लारीच्या महिला महाविद्यालयातून कला स्नातक ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी १९७७ साली त्यांनी बंगलोर येथील रेणुकाचार्य विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी प्राप्त केली. सन १९७८ साली त्यांनी वकिलीची सुरुवात केली.